चंद्रपूर : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्हातील दारू बंदी उठवीलयाची घोषणा मागील आठवळ्यात केली असता जिल्ह्यातील काही सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना मधे नाराजीचा सूर दिसून येत होता मात्र आज शुक्रवारला गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जिहाधिकारी कार्यालया समोर दारूबंदी कायम ठेवण्याची निदर्शने करीत आंदोलन केले.
चंद्रपूर जिह्यातील महिलांच्या आंदोलनाची दखल घेत तत्कालीन पालकमंत्री मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात 1 एप्रिल 2015 पासून दारू बंदी केली मात्र अवैध दारू ला रोखण्यास पूर्णता ते अपयशी ठरले परिणामी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ झाली .लाखो लिटर दारूचा महापूर जिल्यात वाहू लागला, बेरोजगारीचे प्रमाण वाढले.
दारू बंदी फसल्याचे कारण देत पालकमंत्री वेडेट्टीवार यांनी चंद्रपुर जिल्ह्यातील दारू बंदी उठवली असता दारू बंदी कायम ठेवण्यांत यावी म्हणून गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकरर्त्यांनी निर्देशने दिली.