घुग्घुस : नगरपरिषद हद्दीत जुगार क्लब, दारू तस्करी व विक्री , गांजा विक्री यासह अन्य अवैध धंद्यांना उत आलेला असून गावातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात या अवैध धंद्याच्या जाळ्यात अडकलेले असून त्यांचे आयुष्य बर्बाद होत आहे.
या अवैध धंद्यावर कडक कारवाई करून सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करावे या करिता घुग्घुस काँग्रेस तर्फे शिष्टमंडळाने घुग्घुस पोलीस स्टेशन येथे ठाणेदार यांना निवेदनातून मागणी केली आहे.
शिष्टमंडळात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.