जनता महाविद्यालय व जनता करीअर लॉंचरने राखली बारावीत यशाची उत्तम परंपरा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• बारावी विज्ञान शाखेतील निकालाची उत्कृष्ठ परंपरा कायम

• विज्ञान शाखेचा निकाल १००%

• बहुतांश विद्यार्थी प्राविण्य प्राप्त व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणी उच्च माध्यमिक मंडळाद्वारे शासन निर्णयानुसार बारावीचा सत्र २०२०-२१ चा निकाल आज (दि.३) ला जाहिर केला. यानुसार याहीवर्षी जनता कनिष्ठ महाविद्यालयाने व जनता करीअर लॉंचरने यशाचा इतिहास अबाधित ठेवला आहे. जनता कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल १००% तर जनता करीअर लॉंचरचा निकाल १००% इतका लागलेला आहे. तसेच कला, वाणिज्य व एम.सी.व्ही.सी. शाखांचा निकालही १००% लागलेला आहे.

महाविद्यालयातून विज्ञान शाखेचा अमन धामगये (९९.३३%), श्रेयस पवार (९८.८३%), कु. रुतुजा पाटील (९८.८३%), आर्या वहाणे (९८.३३%), वैभव्या गण्धेवार (९८.३३%), मृणाल बुटले (९८.१६%), पार्थ वनकर (९८%), आयुष जुनघरी (९८%), अपुर्वा देवगडे (९७.८३%), ए.डी. बेलगावकर (९७.५०%), खुशी जैन (९७.५०%), खुशी वाळके (९७.५०%), परम गोवर्धन (९७.५०%), तिशा बारसागडे (९७.५०%), निखिल चांदेकर (९७.१७%), देबनाथ किरण (९७%), आर्या गंगरेड्डीवार (९७%), पी.पी. वाघमारे (९६.८३%), अनुप देवाळकर (९६.८३%), हर्श सावरकर (९६.८३%), श्रुती कोल्हे (९६.८३%), वेदांती मुडके (९६.६६%), अनुश्री ठाकरे (९६.६६%), अनुराग आस्वले (९६.६६%) या विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केलेली आहेत. तर ९०% हून अधिक २०२ विद्यार्थी प्राविण्य प्राप्त आहेत.

कला शाखेतून प्रणय सुनिल बलकी (८४.३३%), ऋतूजा शंकर दहेगांवकर(८३.८३%), क्रिष्ना सुभाष कुंदगिर(८३.३३%) या विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे.

वाणिज्य शाखेतून सुधांशु बावणे (९२%), कु. पुजा ताजने (९०.६७%), कु. रोषनी कराडे (८८%) या विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. एम.सी.व्ही.सी. शाखेतून कु. किरण माडोत (८६.८३%), आदेश पगडपल्लीवार (८३.५०%), नाजियाबानो मुन्ना शेख (८१.६६%) या विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे.
प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई जिवतोडे, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अशोक जिवतोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. सुभाष, उपप्राचार्य प्रा.सौ. के.ए. रंगारी, डॉ. के.सी.पाटील, प्रा. व्ही.एस.बोढाले, प्रा. माया धमगाये, प्रा. विद्या शिंदे, प्रा. डी.बी. हेपट, प्रा. संजय पवार, प्रा.जी.बी. दरवे, प्रा. शरद कूत्तरमारे, प्रा. रविकांत वरारकर, प्रा. प्रवीण चटप, प्रा. महेश यार्दी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.