चंद्रपूर जिल्हय़ात बिबटच्या दोन पिलांचा मृत्यू ;  वाघाच्या हल्यात मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील जाटलापूर गावाचे पांदन रस्त्यालगत बिबटच्या दोन पिलांचा मृत्यू झाल्याची घटना आज 4 आॅगस्ट रोजी सकाळी 6.30 वाजता च्या दरम्यान उघडकीस आली आहे. सदर दोन्ही बिबटच्या पिल्लांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सदर घटनेने माहिती प्राप्त होताच वनाधिकारी , क्षेत्रीय कर्मचारी व श बंडु धोतरे , NTCA प्रतिनिधी तसेच विवेक करंबेळकर , मानद वन्यजीव रक्षक हे तात्काळ घटनास्थळी उपस्थितीत झाले. मृत पिलांचे शव शवविच्छेदनासाठी डॉ . सुरपाम , पशुवैद्यकीय अधिकारी , पंचायत समिती , सिंदेवाही , पशुधन विकास अधिकारी डॉ. संतोष गवारे , पशुधन विकास अधिकारी डॉ . पराग खोब्रागडे यांना पाचारण करण्यात आले . पशुवैद्यकिय अधिका – यांचे सदर चमुने बिबटच्या पिलांचे शव विच्छेदन केले . शवावरील जखमा व आसपास वाघाच्या पाऊलखुणा यावरुन सदरील पिलांचा मृत्यू वाघाचे हल्ल्यात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे . तथापी , शव विच्छेदन अहवालावरून पिलांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल . शवविच्छेदनानंतर उपस्थित वनाधिकारी , NTCA चे प्रतिनिधी व मानद वन्यजीव रक्षक , ब्रम्हपुरी यांचे समक्ष बिबटच्या पिलांच्या मृत शरीराचे दहन करण्यात आले .