मुनगंटीवारांच्या मध्यस्थि नंतर पशुवैद्यकांचे आंदोलन मागे

• शुभम डोंगे पाटील यांचा पुढाकार

वणी : पशुधन पर्यवेशक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी संवर्गाच्या प्रलंबित मागण्या शासन पातळीवर मान्य करून घेण्यासाठी दहा जूनपासून जिल्हाभर आपले आंदोलन सुरू केले असून, या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला होता.

वणी येथे चालू असलेल्या आंदोलनाला भाजपचे युवा नेते शुभम डोंगे पाटील यांनी भेट देऊन आपल्या दुरध्वनी वरुन मा.माजी अर्थ मंत्री व वने नियोजन मंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क करून पशुवैद्यकांच्या समस्या मांडल्या यानंतर लगेच मुनगंटीवार यांनी पशुसंवर्धन मंत्री ना सुनील जी केदार यांच्याशी संपर्क करून पशुवैद्यकांच्या समस्यांवर चर्चा केली ना केदार यांनी लगेच पाच समस्या सोडविण्याचे आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांना दिले त्यानंतर आंदोलन कर्त्यांचे समाधान झाल्याने त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
या प्रसंगी डॉ. मंगेश झाडे, सहसचिव यवतमाळ जिल्हा, डॉ. मून, जि.अपाध्यक्ष ,डॉ. वानखेडे, डॉ. राजगडकर,डॉ. जांभुळे, डॉ. सावरकर, डॉ. राठोड, डॉ. डाहुले, डॉ. पाटील, डॉ. चटप उपस्थित होते.