Gopani Iron & Power (india) Pvt Ltd कंपनी व्यवस्थापनाने तब्बल १२० कामगारांना केले कमी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

कामगांराना कामावर घ्या, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील : दिनेश चोखरे

चंद्रपूर : गोपानी आर्यन अँन्ड पॉवर या कंपनी व्यवस्थापनाने पूर्वसूचना न देता तब्बल १२० कामगारांना कामावरुन कमी केले. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष आहे. कामगांराना कामावर घ्या, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ताडाळी एमआयडीसी स्पंज आर्यन कामगार संघटना ताडाळीचे अध्यक्ष दिनेश चोखारे यांनी दिला. या संघटनेचे कामगार गोपानी आर्यन अँन्ड पॉवर येथे मागील १७ वर्षांपासून कार्यरत होते. करारनाम्याची मुदत मार्च -२०२१ मध्ये संपली.

त्यानंतर वेतन वाढीसाठी पत्रव्यवहार केला. त्या अनुषंगाने गोपानी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यामध्ये चर्चेला सुरुवात करण्यात आली. परंतु चर्चा सुरु असताना जुलै २०२१ या महिन्याचे अधे वेतन कपात करण्यात आले.

त्यानंतर शुक्रवारी ३ सप्टेंबरला जवळपास १२० गामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरुन कमी करण्यात आले. त्यामुळे संघटनेचे अध्यक्ष दिनेश चोखारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. कामगारांच्या समस्या त्वरीत सोडवाव्या. नोकरीवरून काढण्याच्या अनपेक्षित हल्याने त्यांचे मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे.