WCL अधिकाऱ्या तर्फे समस्याग्रस्त शिवनगर वस्तीतील समस्या निकाली

काँग्रेसच्या मानले वेकोली अधिकाऱ्यांचे आभार

घुग्घुस : वेकोलीने कॉलरी नंबर एक येथून नागरिकांना स्थलांतरीत करून शिवनगर वस्ती बसविली या वस्तीला दत्तक घेवून येथील वीज, पाणी मोफत द्यायचे वचन दिले. मात्र सध्या परिस्थिती शिवनगर वस्तीत नागरिकांच्या नळाला पाणीच येत नाही. तसेच गांधीनगर, सुभाषनगर, वसाहतीत सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून वेकोलीच्या इमारती जीर्ण झाल्या असून धोकादायक स्तिथीत आल्याने इमारत दुरुस्ती व कचराकुंडी लावण्यासाठी व अन्य समस्यांच्या निवरणा करिता काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, इंटक नेते लक्ष्मण सादलावार यांच्या नेतृत्वाखाली सब एरियावर धडक मोर्चा काढण्यात आले.

त्याठिकाणी झालेल्या सकारात्मक निर्णयानुसार आज सकाळीच वेकोली अधिकारी बिन्नी सर,काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर यांनी संयुक्तरित्या नागरिकांसह संपूर्ण शिवनगरचा दौरा करून समस्या जाणून घेतल्या उद्या नळ दुरुस्ती, व्हॉल्व लावणे व पाण्याची वेळ वाढविण्याचे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.

इतक्या तातळीने नागरिकांच्या समस्यावर ऍकशन पाहून नागरिक आश्चर्यचकित झाले. नागरिकांनी काँग्रेस अध्यक्षांचे आभार मानले तर नागरिकांच्या समस्या निकाली काढल्याने काँग्रेस नेत्यांनी वेकोली अधिकाऱ्यांचे आभार मानले.

याप्रसंगी वेकोलीचे अजय पाटील, नुरुल सिद्दिकी, इर्शाद कुरेशी, रोशन दंतलवार, विशाल मादर, रोहित डाकूर, शुभम घोडके, सुनील पाटील, सौ. पूजा कांबळे, विजया मूर्ती पेरकुरला,प्रेरणा लिंगमपल्ली, शारदा आकाश पेरकुरला, रिना रवी पेरकुरला व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.