• राजू यादव हत्याकांडात नवीन खुलासा
चंद्रपूर : राजुरा शहरातील गजबजलेल्या नाका नंबर तीन जवळ मयूर हेअर सलून मध्ये झालेल्या राजू यादव यांच्या हत्याकांडात नवीन खुलासा झाला असून आरोपींनी हत्या करण्यासाठी वापरलेली बंदूक ही बल्लारपूर येथील एका मृत व्यक्तीच्या नावानी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोपी चंदन सिंग आणि सतेंद्रकुमार सिंग यांनी पोलिसांना दिलेल्या माहिती वरून स्पष्ट झाले आहे. वेकोली बल्लारपूर क्षेत्रात कोळसा खाणीं असून या परिसरात परप्रांतीय नागरिक रोजगाराच्या शोधात येतात. येणा-या नागरिकांची कुठेच नोंद नसते. सास्ती पोलीस चौकी मध्ये पोलीसांची संख्या वाढविणे आवश्यक आहे कारण सात खाणींमधून शेकडो ट्रक दररोज निघतात. अनेक वर्षे झाली परंतु वेकोली च्या नियोजन शून्य कारभारामुळे अनेक घटना घडत आहेत. खाणीतील कोळसा वाहतूक करण्यासाठी वाहने लावताना वेकोलीने आपले कर्मचारी लावून वाहनांचे नंबर लावल्यास वाद होणार नाही. वेकोली परिसरात गुणेगारी प्रवृत्ती वाढत आहे. वेकोली मधून कोळसा उचलण्याच्या वादातूनच हत्याकांड घडून आले हे वाढत असलेले संघर्ष बंद होणे आवश्यक आहे आहे.