ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानात कंत्राटी पदभरती

0
312
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर येथे ११ महिन्याच्या कंत्राटी तत्वावर अकाऊंटन्ट कम टॅली ऑपरेटर व गेट मॅनेजर ची नेमणुक करावयाची आहे. अधिकची माहिती   www.mahaforest.gov.in  आणि www.mytadoba.org या संकेतस्थळावर व प्रकल्पाच्या विविध कार्यालयामध्ये नोटिस  बोर्डावर तपशीलवारपणे दिली आहे. इच्छुकांनी परिपूर्ण बायोडाटा आणि इतर कागदपत्रे कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, मुल रोड,  चंद्रपूर- ४४२४०१ दुरध्वनी क्रमांक ०७१७२-२५१४१४ यांच्या कार्यालयास पोस्टाने /समक्ष/ई-मेल  यावर दिनांक १७ फेब्रुवारी २०२१ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत किंवा त्याआधी पाठवावे. प्राथमिक छाननीनंतर योग्य उमेदवारांना मुलाखतीची तारीख व वेळ दुरध्वनी संदेश /पत्र/ ई-मेल द्वारे कळविण्यात येईल, तसेच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक यांनी कळविले आहे.