ATS ची मोठी कारवाई; अमरावती शहरात जिलेटीनच्या तब्बल 1500 कांड्या जप्त

0
304

अमरावती : दहशतवादी विरोधी पथकाने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठी कारवाई केली आहे. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशतवादविरोधी पथकाने अंदाजे 1200 ते 1500 जिलेटीनच्या कांड्या जप्त केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार स्फोटक पदार्थांचा हा साठा तीन वाहनांमध्ये भरून ठेवलेला होता.

मिळालेल्या माहितीनुसार मालेगावमधील फ्रेजपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मासोद येथे जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेल्या तीन गाड्या असल्याचे दहशतवाद विरोधी पथकाला समजले. त्यानंतर एटीएसच्या पथकाने कारवाई करण्यासाठी सापळा रचला. एटीएसने फ्रेजपुरा येथील मासोदमध्ये कारवाई करत येथील अंदाजे 1200 ते 1500 जिलेटीनच्या कांड्या जप्त केल्या. सध्या या कांड्यांना मोजण्याचे काम सुरु आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात जिलेटीनच्या कांड्या नेमक्या आल्या कुोठून याचासुद्धा तपास एटीएसकडून सुरु आहे.