Breaking :डॉ. मत्ते यांच्यावर धारदार शास्त्राने हल्ला गंभीर जखमी, उपचार सुरू

0
1427

वणी : येथील यात्रा मैदान परिसरात सोमवार दि. 5 एप्रिल ला दुपारी 1 वाजताच्या सुमारास 2 ते 3 हल्लेखोरानी डॉ. पद्माकर मत्ते यांचेवर धारदार शास्त्राने हल्ला चढवला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

डॉ. मत्ते हे नेहमी प्रमाणे आपल्या क्लीनिक मध्ये रुग्ण तपासत होते. दुपारी 2 ते 3 हल्लेखोर दुचाकी क्रमांक एम.एच.29 बी.जी. 2950 ने आले. दुचाकी दवाखान्या समोर पार्क करून क्लीनिक वर धावा बोलला आणि काही कळायच्या आता त्यांनी धारदार शास्त्राने सपासप तीन वार केले. डॉ. मत्ते यांच्या डोळ्याला, पोटावर व पाठीवर गंभीर जखम झाली असून ते रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले.

यावेळी दवाखान्यात उपस्थित रुग्णात चांगलीच खळबळ माजली. प्रत्यक्षदर्शी ने तातडीने पोलिसांना सूचित केले. ठाणेदार वैभव जाधव यांनी घटनेचे गांभीर्य बघता घटनास्थळ गाठले. डॉ. मत्ते याना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर आहे.