चंद्रपूर : शनिवार 5 जून रोजी पहाटे सुमारास एसएक्स 4 कार क्र. एमएच 31 सिआर 2032 या वाहनातून अवैध दारू साठा चंद्रपूर शहरात नेत असल्याची गुप्त माहिती पडोली पोलिसांना मिळताच नागपूर-चंद्रपूर राज्य महामार्गवरील पडोली चौकात नाकेबंदी करून सापळा रचला पोलीस दिसताच वाहन चालकाने पळून जाण्यासाठी मॉडर्न पेट्रोल पंप जवळून वाहन वळवून नेण्याचा प्रयत्न केला. हे दिसताच पोलिसानी पाठलाग केला.
पोलीस पाठलाग करताना दिसताच वाहन चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून आडमार्गाने पळ काढला. वाहनाची झाडती घेतली असता त्यात 35 पेटी अवैध देशी दारू आढळून आली.
अवैध देशी दारू किंमत 3 लाख 50 हजार व वाहन किंमत 3 लाख असा एकूण 6 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फरार चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.
ही कारवाही पोलीस निरीक्षक एम.एम. कासार, चंदू ताजने, स्वप्नील बुरीले, संदीप वासेकर, लक्ष्मण रामटेके, सुमित बरडे, किशोर वाकाटे यांनी केली.