पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर हल्ला करणारी वाघीण आढळली मृतावस्थेत

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
• डोणी गावाजवळ एका दाट झुडुपाखाली आढळली होती वाघीण

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. रविकांत खोब्रागडे यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी करणारी वाघीण शनिवारी मृतावस्थेत आढळली.

मूल वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या जानाळा उपक्षेत्रातील डोणी-१ या परिसरात गस्तीवर असताना पथकाला वाघीण मृतावस्थेत आढळली. चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर येथे शवविच्छेदनानंतर तिचे दहन करण्यात आले. २ जून राेजी ही वाघीण वनरक्षकाला डोणी गावापासून दीड किमीवर एका दाट झुडुपाखाली बसलेली आढळली होती.

तेव्हापासून तिच्यावर लक्ष ठेवण्यात आले होते. शनिवार ५ जून रोजी वाघीणीची कोणतीही हालचाल न दिसल्याने वरिष्ठांना कळवण्यात आले.