वयोवृद्ध महिला अत्याचार प्रकरणातील आरोपीस मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : काल शुक्रवारी सकाळी आरोपी मोहम्मद यासिन नूर इस्लाम शेख य 22 वर्ष याने एका वयोवृद्ध महिलेवर अत्याचार केला. फिर्यादीच्या तक्रारी वरून घुग्घुस पोलिसानी आरोपी विरुद्ध कलम 354 (अ) 376 (1) 506 गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपीस चंद्रपूर न्यायालयात हजार केले असता 8 जून मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली.

काल शुक्रवारी सकाळी दरम्यान चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा, दंगा नियंत्रण पथक व फॉरेन्सिक चमू हे घुग्घुस पोलीस स्टेशन येथे दाखल झाले.
घुग्घुस मध्ये कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन सज्ज होते.

पीडित वयोवृद्ध महिला शांतीनगर, घुग्घूस येथील रहिवासी आहे. आरोपी मोहम्मद यासीन नूर इस्लाम शेख (वय 22) रा. झारखंड राज्य हा काही दिवसांपूर्वी घुग्घुस येथील आपल्या नातेवाईकाच्या घरी आला होता.

पीडित वयोवृद्ध महिला शुक्रवारी सकाळी शौचालयास गेली असता आरोपीने अत्याचार केला होता अशी माहिती पोलिस सूत्राने दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक मेघा गोखरे करीत आहेत.