चंद्रपूर : राजुरा शहरातील बहुचर्चित कोळसा व्यापारी राजू यादव हत्याकांडात रोज नवीन खुलासा होत आहे. राजुरा पोलीस यांनी नाका नंबर तीन वरील घटनेच्या दिवशीची सिसिटीव्ही फुटेजमध्ये दोन व्यक्तीच्या हातात बंदूक दिसले याची कसून तपास केले असता हत्याकांडात दोन बंदूक होत्या परंतु एक बंदूक सुरू झाले नाही एकाच बंदुकी मधुन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
दुसरी बंदूक गडचांदूर रोड वरील एका ठिकाणी लपवून ठेवली होती ती राजुराचे ठाणेदार चंद्रशेखर बहादूरे आणि तपास करीत असलेल्या चमुनी जप्त केले. आता पर्यंत आरोपी कडून दोन बंदुका जप्त करण्यात आले आहे. राजुरा पोलीस अधिक तपास करीत आहे.