चंद्रपूर : वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालयातील क्षेत्रीय नियोजन अधिकारी जी पुल्लय्या यांच्या अपमानास्पद वागणकीूमुळे आशा घटे ह्या 19 वर्षीय प्रकल्पग्रस्त युवतीने विष प्राशन करून आत्महत्या केली. आशाची दिनांक 22 मार्च पासून मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर 31 मार्च ला सकाळी तिचे दुर्दैवी निधन झाले.
सुरुवातीला पोलिसांनी तक्रार घेण्यास विलंब केला त्यामुळे शेवटी कुटुंबियांनी तिचे शव क्षत्रिय महाप्रबंधक कार्यालयासमोर ठेऊन आंदोलन केले त्यानंतर अखेर 1 एप्रिल 2021ला वडीलांनी दिलेल्या लेखी तक्रार व तपासानंतर दिनांक 4 एप्रिल ला संध्याकाळी पुल्लय्या यांच्यावर आशा ला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा भा.द.वी.कलम ३०६ अंतर्गत नोंद झाला.
परंतु ह्या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यास झालेला उशीर तसेच पोलीस चौकशीस होत असलेल्या विलंबाचा फायदा घेत आरोपी अधिकारी पुल्लय्या पसार झाला असुन तो अजुनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
पुल्लय्या वास्तव्यास असलेल्या वेकोली वसाहतीच्या शेजारी चौकशी करूनही पोलिसांना कुठलीही पुल्लय्या बाबत किंवा तो सध्या कुठे आहे ह्याबाबत माहिती माहिती मिळालेली नाही. गैरमराठी भाषिक लोकांचा त्या भागात जास्त भरणा असल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत असुन त्यामुळे पुल्लय्या चशो ध घेण्यात अडचणी येत आहेत. पुल्लय्या राहत असलेल्या वेकोली वसाहतीतील घराला दोन कुलुप लाऊन तो पसार पोलीस तपासात स्पष्ट झाले झाल्याचे आहे.
तर तो काम करत असलेल्या कार्यालयातून माहिती घेतली असता पुल्लया ने कुठलाही सुट्टीचा अर्ज दिला नसल्याची तोंडी माहिती वेकोली कार्यालयातून राजुरा पोलीसांना मिळाली असल्याची माहिती तपास अधिकारी एस. पी. दरेकर यांनी सांगितली. त्यामुळे शेवटी राजुरा पोलिसांनी पोलीस स्टेशन मार्फत वेकोली कार्यालयाला पत्रव्यवहाराद्वारे पुल्लयाच्या मूळ गावाच्या पत्त्याविषयी माहिती विचारणा केली आहे.
ह्या प्रकरणात प्राथमिक दृष्ट्या बघितले असता पुल्लय्या ह्याचे नाव समोर आले असले तरीही वेकोलि मधे प्रकल्पग्रस्तांना नोकरीवर रुजू होण्यास अनेक अडचणी येत असुन त्यासाठी पैशांची मागणी सुद्धा होत असल्याची चर्चा असुन ह्या कामात पुल्लय्या ह्यांच्या सह क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालयातील काही कर्मचारी गुंतले असुन पुल्लय्या व्यतिरिक्त अजुन कोणी ह्या घटनेनंतर गैरहजर आहे का? किंवा कोणी जाणूनबुजून आपली रजा वाढविली आहे का? त्याचे पुल्लय्या सोबत काय संबंध आहेत ह्याची आहेत? ह्याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. दरम्यान आशा हिच्या वडिलांनी दिलेल्या माहिती नुसार चंद्रपुर जिल्हा ग्रामीण रूग्णालयातून आशा चा शवविचेदन अहवाल राजुरा पोलीस स्टेशनला पाठविल्याची माहिती आहे. दिनांक 4 एप्रिल ला आशा राहत असलेल्या सास्त्ती येथील घराचा मौका पंचनामा झाला असून केवळ आशाचा सतरा वर्षीय भाऊ गणेश याचे बयान नोंदवणे बाकी आहे.
पुल्लया याला तात्काळ अटक करावी ह्याकरिता विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांसह सर्व समाजाच्या नागरिकांचे निवेदने पोलिसांना तसेच वरिष्ठ अधिकार्यांना देण्यात आली आहेत. आशाच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा नोंद असूनही आरोपी जी. पुल्लय्या मात्र अजूनही मोकाटच आहे, त्यामुळे सामान्य जनतेत रोष पसरत असून आशा आत्महत्या घटनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वेकोली बल्लारपूर चे क्षेत्रीय महाप्रबंधक सव्यसाची डे मात्र अजूनही पोलिसांच्या अहवालाची प्रतीक्षा करत असून वेकोली मार्फत जी.पुल्लया वर अजूनपावेतो कुठलीही कार्यालयीन कार्यवाही न झाल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. गुन्हा नोंद असून विना परवानगी मुख्यालय सोडनार्या जी.पुल्लया यांच्यावर वेकोली ने तात्काळ कठोर कार्यवाही करावी अशी मागणी तेली युवक मंडळाचे कार्याध्यक्ष बादल बेले यांनी केली आहे.