काँग्रेसच्या सर्व ऑर्गनायझेशन मध्ये महिलांना लागू असलेल्या ३३% आरक्षणाची अंमलबजावणी करावी

0
27
चंद्रपूर : महिलांना काँग्रेस पक्षाच्या सर्व बॉडी मध्ये पक्षाध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी जे आरक्षण निर्देशित केले आहे  त्याची अंमलबजावणी व्हावी आणि त्याच प्रमाणे सर्व शासकीय समित्यांमध्ये ३३% आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पक्षाचे संपर्क मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली आणि त्यांना या साठी लेखी निवेदन दिले.
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महिलांना पुरुषांच्या बरोबरीने काम करता यावे त्याचबरोबर महिलांच्या नेतृत्व गुणांना वाव मिळावा या साठी महिलांना प्रदेश, जिल्हा, शहर, त्याचबरोबर सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन या मध्ये जे ३३% आरक्षण दिले आहे, त्याची अंमलबजावणी होत नाही.या आरक्षणाची अंमलबजावणी पूर्ण राज्यात झाली पाहिजे अशी मागणी यावेळी नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कडे केली. त्याच बरोबर सरकार कडून ज्या शासकीय समित्या नियुक्त केल्या जातात त्यात देखील महिलांची संख्या नगण्य असते तेव्हा या सर्व शासकीय समित्यांमध्ये देखील महिलांना ३३% आरक्षण द्यावे जेणेकरून महिलांचा सहभाग या समित्यात वाढेल अशी मागणी ठेमस्कर यांनी केली. यावर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पक्षसंघटनेत महिलांना योग्य भागीदारी दिली जाईल असे अश्वासन दिले. यावेळी जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे, जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्षा चित्रा डांगे, शहर महिला काँग्रेस च्या अध्यक्षा सुनीता अग्रवाल, नगरसेविका सुनीता लोढिया उपस्थित होते.