कोरोना आचारसंहितेचे पालन करून जिल्हाध्यक्ष भोंगळे यांनी साजरा केला भाजपाचा ४१ वा स्थापनादिन

0
117
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घूस : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात शासनाने जमावबंदी व संचारबंदी लागू केली आहे. याचा पूर्ण सन्मान करीत भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी भारतीय जनता पार्टीचा स्थापनादिन घुग्घूस येथे मंगळवार ६ एप्रिलला साजरा केला. विशेष म्हणजे यावेळी भौतिक अंतराचे पालन करीत पक्षध्वजारोहण करण्यात येऊन केक कापण्यात आला.

मा. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र येथे पार पडलेल्या या छोटेखानी सोहळ्यात भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, जिप माजी सभापती नितुताई चौधरी, माजी सरपंच संतोष नूने, माजी सरपंच राजकुमार गोडशेलवार, माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास इसारप, साजन गोहणे, वाहतूक आघाडीचे उपाध्यक्ष विनोद चौधरी, अमोल थेरे, माजी तंमुस अध्यक्ष हसन शेख, भाजपा नेते शरद गेडाम, बबलू सातपुते, डॉ. सुनिल राम, विवेक तिवारी, विनोद जंजर्ला, स्वामी जंगम, गणेश खुटेमाटे या प्रमुखांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले कोरोनाचे संकट वाढत असताना शासन व समाजाला मदतीचा हात देण्याची भूमिका भाजपाची आहे. उत्तम लोकसेवा करूनही आपण भाजपाचा स्थापनादिन साजरा करू शकतो. ८० % समाजकारण व २०% राजकारण हे सूत्र अंगीकारा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. या छोटेखानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन विवेक बोढे यांनी केले तर विनोद चौधरी यांनी आभार मानले.