• उपविभागीय अधिका-याशी असभ्य वर्तणूक
• लिपीकावर गुन्हा दाखल
चंद्रपूर : उपविभागीय अधिकारी कार्यालय गोंडपिंपरी येथे लिपिक पदी कार्यरत सुनील चांदेवार ह्याला दि 3 मे 2021 च्या आदेशनुसार नेमून देण्यात आलेल्या कोरोनाविषयक कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चे काम करण्यास नकार दिला आणि अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून तुला बघून घेतो अशी धमकी दिल्याने उपविभागीय अधिकारी बल्लारपूर ह्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 56, तसेच भारतीय दंड संहिता कलम 188 आणि 506 अन्वये सुनील चांदेवार या बेशिस्त उद्धट कर्मचाऱ्यावर पोलिस स्टेशन बल्लारपूर येथे गुन्हा दाखल केला.
तसेच सदर कर्मचारी इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाविषयीक कामे करू नका ते फक्त आरोग्य विभागाचे काम आहे असे सांगत असून काम करण्यापासून परावृत्त करून कोविड विषयक कामांमध्ये अडथळा आणून काम ठप्प करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून आल्याने सदर कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करून बडतर्फीची कारवाई प्रस्तावित करण्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे उपविभागीय अधिकारी गोंडपिंपरी यांनी पाठवला.