चंद्रपूर : घुग्घुस येथील जिल्हापरिषद प्राथमिक कन्या शाळेत शासना तर्फे 18 ते 45 वयोगटातील नागरिकांची लसीकरण ऑनलाईन पध्दतीने 06 में पासून करण्यात येत आहे.
मात्र सदर नोंदणी ऑनलाईन पध्दतीने असल्याने या केंद्रावर चंद्रपूर व अन्य गावातील नागरिक मोठ्या पध्दतीने येऊन लसीकरण करत आहे.
यामुळे घुग्घुस येथील नागरिकांना लसीकरणा पासून वंचित राहावे लागत आहे. करीता घुग्घुस येथील केंद्रावर फक्त घुग्घुसच्या नागरिकांना लसीकरण करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते राजुरेड्डी यांनी केली आहे.