वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपुर : नागभीड तालुक्यातील वनपरिक्षेत्र तळोधी बाळापुर अंतर्गत येत असलेल्या आलेवाही बीट.कक्ष क्र.703 वाढोणा शेतजमिनीला लागून असलेल्या खरकाडा जंगल परिसरात गाई -म्हशी चराईसाठी घेऊन गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मंगळवारी दिढ वाजता घडली.या परिसरातील सदर दुसरी घटना असून यापूर्वी नुकतीच आकापूर येथील एका गुरख्याला वाघाने ठार केले होते. हा तोच वाघ आसावा असे नागरिकांचे म्हणणे आहे.

गुराख्याचे नाव रमेश जयराम वाघाडे वय 42, असून तो वाढोणा येथील रहिवासी आहे. रमेश हा नेहमीप्रमाणे गाई -म्हशी घेऊन आलेवाही बिट खरकाडा जंगल परिसरात दररोज जात होता. दरम्यान तबा धरून बसलेल्या वाघाने प्रथम म्हशी वर हल्ला केला. त्यामुळे त्याने म्हसीला वाचविण्यासाठी धरपळ केली असता वाघाने त्याच्यावरच हल्ला चढवीला यात तो गंभीर जखमी झाला. दरम्यान लागलीच त्याला वाढोणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले..त्याच्या मागे पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.दरम्यान वन विभागाने जागेवरच पंचनामा केला. यावेळी क्षेत्र सहायक के. डी. गरमडे, बिट वनरक्षक पि. एम गायकवाड यांची उपस्थिती होती.

शव नेताना नागरिकांनी गाडीला अडविले

शव पोस्टमाडम साठी आरोग्य केंद्राच्या गाडीने नेत असताना नागरिकांनी राडा केला दरम्यान पोलिसांना पाचरण करण्यात आले मात्र आर्थिक मदत व शेतासाठी उपाययोजना केल्याशिवाय शव जाऊ देणार नाही.असे सांगत लोकांनी गाडी अडवून धरली.

वाढोणा परीसरातील आलेवाही बीट अंतर्गत शेतशीवार लागून असल्याने जंगलात ट्रॅप कॅमेरे लावण्यात येतील आणि वाघ कोणता आहे यावरून पाळत ठेवल्या जाईल
के. आर. धोंडने
वन परीक्षेत्र अधिकारी, तळोधी (बा.)