• जानेवारी पासून थकीत प्रोत्साहन मानधन द्या
• 12 एप्रिल पासून मनपा कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा
चंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगर पालिका स्तरावर काम करणाऱ्या आशा वर्कर यांचे माहे जानेवारी पासूनचे थकीत मासिक चार हजार रुपये प्रती महिना प्रोत्साहन पर भत्ता पूर्ववत सुरू करावा आणि इतर प्रलंबित मागण्यासाठी महानगर पालिका कार्यालयासमोर आज बुधवारी (7 एप्रिल) ला तीव्र निदर्शने करण्यात आले. आय टक चे राज्य सचिव विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनानंतर महापौर मॅडम, आयुक्त, उपायुक्त व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
महानगर पालिका स्तरावर आशा वर्कर लोकांमध्ये जनजागृती ,आरोग्याची काळजी घेणे,महा आयुष सर्वे करणे, कोविड-19 शी निगडित इतर कामे जीवाची पर्वा न करता करीत आहेत. त्यांना मिळणाऱ्या मानधन व्यतिरिक्त चार हजार रुपये प्रोत्साहन पर भत्ता आगस्त ते डिसेंबर 2020 पर्यंत अदा करण्यात आला आणि जानेवारी पासून पुढे देण्यास मनपा प्रशासन टाळाटाळ करीत आहे. सध्या कोविड मूळे सर्व आशा वर्कर ला मूळ काम करता येत नाही आणि सध्या फक्त कोविड सर्वेक्षण व त्या अनुषंगाने ईतर सर्व कामे त्यांच्यावर बळजबरीने लादत आहेत. चंद्रपूर शहरामध्ये कोविड-19 अनुषंगाने अनेक कामे दररोज 8 ते 9 तास सर्व आशा वर्कर करीत आहेत.तेव्हा त्यांना तातडीने जानेवारी पासून चा थकीत चार हजार रुपये प्रोत्साहन पर भत्ता अदा करण्यात यावे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अनेक आशा वर्करला मोबदला मिळाला नाही. हा थकीत मोबदला प्रतिदिन 150 रू.प्रमाणे तातडीने अदा करण्यात यावे.सर्व आशा वर्कर ला सन्मानाची वागणूक देण्यात यावी.नियमित केलेल्या कामाचा थकीत मोबदला त्वरित देण्यात यावा व या पुढे दर महिन्याच्या 1 तारखेला आशांच्या बँक खात्यात मोबदला जमा करण्यात यावा.राज्य सरकारने वाढवून दिलेले नोव्हेंबर महिन्या पासूनचे थकीत मासिक दोन हजार रुपये मानधन वाढ त्वरित देण्यात यावी. कोविड सेंटरला आशा वर्कर ची काही झोनला बळजबरीने ड्युटी लावण्याचा प्रयत्न होत आहे ते त्वरित थांबविण्यात यावे. झोन न.4 ची श्रीमती वर्षा सातपुते सिस्टर आशा वर्कर ला असभ्य वागणूक देऊन मानसिक व शारीरिक त्रास देतात तसेच काही आशांच्या अंगावर धावून हात उगरण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा अशा मुजोर सिस्टर ला तातडीने निलंबित करण्यात यावे किंवा बदली करण्यात यावी. दि.31/3/2021 च्या मनपा कार्यालयाने काढलेल्या पत्रा नुसार आशा वर्करला अनेक कामे करण्याची सक्ती लादण्यात आली आहे व जाचक अटी लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अन्यायकायक पत्र तातडीने रद्द करून करण्यात यावे. मागील वर्षी फरवरी 2020 मध्ये काही नवीन आशा वर्कर नियुक्त करण्यात आल्या. त्यांच्या कडून 7 महिने सर्व कामे नियमित करवून घेण्यात आले. मोबदला देताना ट्रेनिंग झाली नाही म्हणून मोबदला देता येणार नाही असे सांगितल्या येत आहे. त्यामुळे केलेल्या कामाचा मोबदला देण्यात यावा.
काही झोन मध्ये आशा वर्कर सर्व कामे करीत असताना जर त्यांच्या कार्यक्षेत्रात गरोदर मातांची केस मिळाली नाही तर त्यांना त्या महिन्यात अहवाल वाउचर दिल्या जात नाही त्यामुळे सबंधित आशा वर्कर यांना वाढीव मानधन पासून वंचित राहावे लागते, तेव्हा ही अट रद्द करण्यात यावी.
योग्य तोडगा न निघाल्याने संघटनेच्या वतीने येत्या 12 एप्रिल 2021 पासून बेमुदत कामबंद आंदोलन व मनपा कार्यालयात मुक्कामी ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा आय टक चे राज्य सचिव विनोद झोडगे, भाकप नेते प्रा.नामदेव कनाके,संयुक्त खदान मजदुर संघाचे नेते कॉ.प्रदीप चीताडे,आशा वर्कर संघटनेच्या शहर अध्यक्ष वैशाली जुप्पाका,सचिव प्रतिमा कायारकर,सविता गटलेवार,सुकेषणी शंभरकर यांनी दिला आहे.