• सावधान तहान आणि भूकेच्या मधात अडसर ठरू नका
चंद्रपूर : उन्हाळा सुरू झाला की माकडांचे वास्तव्य गावाच्या अवतीभवती असते. आंबा, चिंच किंवा अन्य कोणत्याही झाडावर चढून उच्छाद मांडतात. आंबे असो अन्य फळे किंवा घरांवर वाळू टाकलेल्या पदार्थावर यथेच्छ ताव मारतात. परंतू उच्छाद मांडणा-या माकडाला आपण हाकलण्याच्या मारहाण केली आणि त्याचा मृत्यू झाला तर लक्षात ठेवा आपल्यावरही वनविभाग आणि पोलिस विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. चंद्रपुरातील बंगाली कॅम्प परिसरामध्ये अशीच एक घटना घडली आहे. बंगाली कॅम्प परिसरामध्ये झाडावर आंबे खात असलेल्या माकडाला मारहाण केली. यात माकड खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात वनविभागाने महिलेवर गुन्हा दाखल केला. पारुल गोलधर ( ५२ ) रा . बंगाली कॅम्प असे आरोपी महिलेचे नाव आहे. येथील भगतसिंग चौकामध्ये या महिलेचे घर आहे.
दरवेळी उन्हाळ्यात वन्यप्राणी गावांच्या दिशेने धाव घेतात. गावाच्या शेजारी असणाऱ्या तलावातील पाण्यावर आपली तृष्णा भागवितात. गावाच्या अवतीभवती राहून भक्ष्यही शोधतात. उन्हाळ्याच्या दिवसात तर माकडांचा शहरातील इमारती आणि झाडांवर चांगलाच उच्छाद असतो. ते फळे आणि इमारतीवर वाळू टाकलेल्या पदार्थावर यथेच्छ ताव मारून भूक भागवीत असतात, हे चित्र नेहमीच पहायला मिळते.
चंद्रपुरात बंगाली कॅम्प परिसरामध्ये पारुल गोलधर या महिलेच्या घरी काल मंगळवारी (६ एप्रिल) ला आंब्याच्या झाडावर माकड आपल्या पिल्लांसह येऊन बसला. झाडाला आंबे लागून असल्याने माकडाने त्यावर ताव मारणे सुरू केले. सदर महिला घरीच असल्यानेतिला माकड आंबे खात असल्याचे दिसले. महिलेने माकडांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. माकडाला मारहाण केली आणी माकडा झाडावरून थेट खाली पडला. काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. प्यार फाउंडेशन नावाच्या एका पर्यावरणवादी संस्थेला सदर घटनेची माहिती झाली. फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र रापल्ली यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि मानवाने प्राण्याबाबत दाखविलेली क्रुरता असल्याचे सांगून त्यांनी आणि सदर घटनेची (प्राॅसीक्युशन आॅफ रिपोर्ट) तक्रार वन विभागाकडे दाखल केली. त्या आधारे वनविभागाच्या अहवालावरून रामनगर पोलिसांनी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने माकडे आपली तृष्णा आणि भूक भागविण्यासाठी गावात येतात. त्यांची तृष्णा आणि भूक भागविणेच्या मधात आपण अडसर ठरलो तर आपल्यावरही अशाच प्रकारचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असेच चंद्रपुरात घडलेल्या या घटनेवरून दिसून येत आहे.