• ताडोबातील चवताळलेला गजराज हत्ती पहाटे जेरबंद
• ताडोबा-अंधारी प्रकल्पातील बोटेझरी छावणीत वास्तव्यास आहे गजराज
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी छावणी परिसरात मोकाट असलेल्या गजराज नावाच्या नर हत्तीने काल गुरुवारी (6 मे) सायंकाळच्या सुमारास वाहनचालक वनकर्मचारी यांचेसह एसिएस व मुख्य लेखापाल यांचेवर अचानक हल्ला केला. यात वाहनचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात मुख्य लेखापाल प्रमोद गौरकर यांनी प्रयत्न केला असता चवथाळलेल्या गजराजने वाहनचालकाला सोडून मुख्यलेखापाल यांना पायाखाली चिरडून ठार केल्याची घटना समोर आली आहे. रात्रभराच्या थरारानंतर गजराजला पहाटेला जेरबंद करण्यास यश आले आहे.
ताडोबा-अंधारी अभयारण्य राष्ट्रीय प्रकल्प पर्यटन करिता बोटेझरी छावणीत गजराज नावाचा नर हत्तीसह अन्य तीन हत्ती या ठिकाणी आहेत. एका हत्तीचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. या ताडोबा-अंधारी राष्ट्रीय प्रकल्पात बोटेझरी परिसरात येणारे पर्यटक खासकरून गजराजची शाही स्वारी करून पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटतात. परंतू सध्या सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे ताडोबा-अंधारी प्रकल्पात पर्यटनाच्या सर्व सुविधा बंद आहेत. त्यामुळे बोटेझरीतील हत्ती मोकाटच आहेत.
काल गुरूवारी एसीएफ, मुख्य लेखापाल यांचेही एक वनकर्मचारी, आणि सोबत असलेल्या वाहनाचे चालक असे चौघेजण बोटेझरी परिसरात आपले कर्तव्य बजावत होते. अलीकडेच येवून गेलेल्या पावसामुळे अभयारण्यातील बोटेझरी परिसरातील रस्ता ठिकठिकाणी चिखलाने पुरता खराब झाला आहे. टाटासुमो वाहनाने या परिसरात भ्रमंती करताना वाहन चिखलात फसले. सदर वाहनाला काढण्याचा प्रयत्न सुरू असताना नजीकच गजराज सैरावैरा पळत असल्याचे दिसून आले. गजराज थेट वाहनाच्या दिशेने धडकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात चोघेही अधिकारी कर्मचारी आपला जीव वाचवित इतरत्र पळावे. यावेळी गजराजने वाहन पलटवून दिला. परत गजराज इतरत्र गेल्याने परत वाहन सरळ करण्याकरिता वाहनचालक आणि अधिकारी प्रयत्नात होते. गजराजने पुन्हा परतून हल्ला केला. यावेळी वाहनचालक हा तिथेच असल्याने गजराजला तिथून हाकलून लावण्यासाठी लेखापाल गौरकार यांनी प्रयत्न केला. त्यामुळे गजराजने वाहनचालक आणि इतरांना सोडून लेखापालाचा पाठलाग केला आणि वाहनचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात हत्ती गजराजच्या पायाखाली चिरडून अत्यंत दुर्दैवी मृत्यू आल्याचा घटनाक्रम समोर आला आहे.