स्वयंपाक गॅस व खाण्याच्या तेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे ” चूल पेटवा” भजे तळा आंदोलन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : कोरोना महामारी मूळे लावलेल्या संचारबंदी, लॉकडाऊन मुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिक बेरोजगार झाले, युवकांच्या हाताला काम नाही, छोटे व्यापारी पूर्णपणे उध्वस्त झाले हातावर आणून पानावर खाणाऱ्याचे जगणेच कठीण झाले यामुळे नागरिकांना केंद्र शासनातर्फे मददतीची अपेक्षा होती.

हजारो कोटीचे पोकळ पॅकेज जाहीर करून केवळ देशाच्या जनतेची दिशाभूल करणाऱ्या केंद्र शासनाने स्वयंपाक गॅसची प्रचंड दरवाढ केलेली आहे
यासोबतच खाण्याच्या तेलात झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे गृहिणीचे घरातील संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडून गेल्याने कुटूंबाचा गाडा चालविणेच अशक्य झालेले आहेत.

यामुळे केंद्र शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच देशातील बेरोजगारांना पंतप्रधान मोदी यांनी सुचविलेले ” पकोडा रोजगाराचे” मार्गदर्शन करण्यासाठी आज घुग्घुस काँग्रेस तर्फे काँग्रेस कार्यलया समोरील आंगणात स्वयंपाक गॅसला हार घालून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली विटेच्या चुली पेटवून त्यावर भजे तळून नागरिकांना वाटप करीत केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
केंद्र शासना विरोधात
” मोदी सरकार मुर्दाबाद” मोदी सरकार हाय – हाय घोषणा देण्यात आले.

याप्रसंगी घुग्घुस शहर अध्यक्ष राजूरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, सौ. संगीता बोबडे, सौ.पदमा त्रिवेणी,संध्या मंडल,सौ. मंगला बुरांडे,सोनी गोदारी,अरुणा कापरे,सुवर्णा गोदारी,रूपा गोदारी,तारा बाई बोबडे,नंदा वर्जे,संतोषी चिने, दुर्गा पाटील, अमिना बेगम शेख, एस्सी सेल जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, युवक नेते सुरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख, अजय उपाध्ये, शेखर तंगलापल्ली, प्रफुल हिकरे, जावेद कुरेशी, सिनू गुडला, विजय माटला,इर्शाद कुरेशी, शहजाद शेख,बालकिशन कुळसंगे, विशाल मादर, नुरूल सिद्दीकी,रोशन दंतलवार, सचिन कोंडावार,रमेश रुद्रारप,कुमार रुद्रारप,निखिल पुनघंटी, संपत कोंकटी,राजकुमार मूळे, शीतल कांबळे,सुनील पाटील,रंजित राखूडे, स्वागत बुरचुंडे, व मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.