जात पंचायतेने टाकला बहीस्कार,वडीलांचा पार्थिवाला मुलीने दिला खांदा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जातीचा जाळ्यातून भारतीय समाज अद्यापही मुक्त झालेला नाही. याचा प्रत्यय चंद्रपूर मध्ये घडलेल्या घटनेने पुन्हा समोर आले आहे. मृतदेहाला खांदा देण्यासाठी समाजाने नाकारले. अखेर मुलीनीच वडीलांचा मृतदेह खांद्यावर उचलून शम्शान भुमित नेले.

चंद्रपूर येथिल प्रकाश गणपत ओगले यांचा मृत्यू रविवारला झाला. त्यांना सात मुली अन दोन मुले आहेत.जूनी भांडी विकून ओगले परिवार उदर्निवाह करीत होता.त्यांचा मृत्यूनंतर पार्थिवाला खांदा देण्याचे समाजाने नाकारले.

अखेर त्यांचा मुलीने वडीलांचा पार्थिवाला खांदा दिला.या प्रकाराने समाजमन हादरले आहे.