कोरपणा तालुका काँग्रेस कमिटी तर्फे पेट्रोल – डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ धरणे आंदोलन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलनाचे आयोजन

वनसडी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस द्वारा आयोजित राज्यव्यापी धरणे आंदोलनात कोरपना तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून सहभाग नोंदविला , राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या मागर्दशनाखाली धरणे आंदोलनाचे आयोजन साईश्रद्धा पेट्रोल पम्प कोरपणा येथे घेण्यात आले.

मोदी सरकारने ने देशातील जनतेला वेठीस धरत इंधनाचे दर भरमसाठ वाढीवलीले आहे सध्या पेट्रोल 102 रुपये तर डिझेल 93 व गॅस सिलेंडर 950 ह्या दराने मिळत आहे यामुळे सामान्य जनतेचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे यावर कडाडून विरोध करण्यात आला . जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयरावजी बावणे यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारच्या ध्येय धोरणावर कडाडून टीका केली आहे याप्रसंगी माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य शामभाऊ रणदिवे , माजी जि. प.सदस्य उत्तमरावजी पेचे यांनी निषेधार्थ आपले मत मांडले .

सदर धरणे आंदोलनात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते विजयरावजी बावणे , माजी जि. प.सदस्य उत्तमरावजी पेचे , पंचायत समिती कोरपणा माजी सभापती तथा सदस्य शामभाऊ रणदिवे , श्री सीतारामजी कोडापे जेष्ठ नेते ,श्री भाऊजी चव्हाण, श्री राजाबाबू गलगट , श्री गणेश गोडे , श्री भारतजी चन्ने , श्री सुनीलभाऊ बावणे शहराध्यक्ष ,श्री मनोहरराव चन्ने , श्री इस्तारी गुज्जेवार , रसूल पटेल , निसार शेख , रोशन आस्वले ,कवडू मडावी , अफजल भाई , भिमरतन भगत , भारत गौरी , यश दुर्गमवार , दिपक भगत,अरुण पारखी, इसाक बेग , श्री बाबरावजी मालेकर , रोशन मरापे,विलास मडावी, स्वप्नील गभने , उत्तमराव गेडाम, कवडू खोबरकर इत्यादी सहभागी झाले होते