◆ एकास मारहाण ; आरोपीला अटक
चंद्रपूर : नागभीड तालुक्यात मिंडाळा येथील घटना ताजी असताना पुन्हा मोहाडी मोकासा येथे जादूटोणा केल्याच्या कारणावरून एका व्यक्तीला चप्पल आणि लाथाबुक्याने मारहाण केल्याची घटना काल सोमवारी (6 सप्टेंबर 2021) उडकिस आली आहे. या प्रकरणात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
नागभीड तालुक्यातील मोहाडी (मोकासा) येथील रहिवासी दिलीप सीताराम वाघ (वय 49) हे घरी वरांड्याचे दरवाजात बसले असताना काल सोमवारी 6 सप्टेंबर ला साडेसातच्या सुमारास आरोपी विकास विनायक गजभे (वय 19) रा मोहाडी (मोकासा )याने शिताराम यांचे घरी येऊन तूने माझा मोठा भाऊ वैभव वर जादू केली आहे, तू घराबाहेर निघ असे म्हणून त्याने तक्रारदार यास शिवीगाळ करून चप्पल आणि हातबुक्कीने मारपीट केली.
या प्रकरणात पो स्टेशन नागभीड येथे कलम 452,323,504 भा द वी सहकलम 3(1),3(2) महा ,नरबळी आणि ईतर अमानुष, अनिष्ट, व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबतचे अधिनियम 2013 अन्वये गुन्हा कालच सोमवारी गुन्हा दाखल करण्यात येवून आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे.
आरोपी व तक्रारदार एकाच समाजाचे असून, शांतता आहे, लोकांनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये व शांतता राखावी असे आवाहन पोलिस अधीक्षक चंद्रपूर श्री अरविंद साळवे यांनी केले आहे.