ताडोबात लक्ष्मी हत्तीनीने दिला पिलाला जन्म

लक्ष्मीचा हा दुसरा बाळ; पहिला बाळ तीन ते चार वर्षाचा

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्रतील बोटेझरी हत्ती कॅम्प येथील लक्ष्मी नामक हत्तीनीने काल सोमवारी (6 सप्टेंबर 2021) रात्री एका गोंडस पिलाला जन्म दिला. तो नर असून, आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. या पूर्वी लक्ष्मीचा पहिला बाळ हा तीन ते चार वर्षाचा आहे.

लक्ष्मी आणि पिल्लाची यथायोग्य काळजी घेतली जात असल्याची माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी पुढारीला दिली आहे.
जगभरात व्याघ्र पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांचे मोठे साम्राज्य आहे.

त्यामुळेच जगभरात ताडोबाची ओळख या ठिकाणी येणा-या देशविदेशातील पर्यटकांच्या माध्यमातून होत आहे. या व्याघ्र प्रकल्पात हत्तीचेही संगोपण चांगल्या प्रकारे केल्या जात आहे. सध्या लक्ष्मी आणि त्यांच्या पिल्लाचे फोटो लुभावने असेच आहे.