चंद्रपुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या तोंडाला काळे फासले

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे निषेध आंदोलन

चंद्रपूर : राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यावर खोटे आरोप करून बदनामी करणा-या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जुते, चपलांनी चोप देण्यात आला. तसेच तोंडाला काळे फासून निषेध नोंदविण्यात आला. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात शहरातील कस्तुरबा चौकात मंगळवारी (ता.७) दुपारी १२ वाजता आंदोलन करण्यात आले.