कोरोना केंद्रात एकाच खाटेवर दोघांना जागा, एका खोलीत तीन रूग्ण!

0
208
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• एकाच खाटेवर दोघांना जागा दिल्याने संताप
अधिकारी म्हणतात, ही नवी बाब नाही !

चंद्रपूर : कोरोनाच्या दुसर्याध लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा व मनपा प्रशासन सज्ज झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, वनराजिक महाविद्यालयात असलेल्या बाधितांच्या केंद्रात एकाच खोलीत तिघांना ठेवले जात असून, कळस म्हणजे एकाच खाटेवर दोन जणांना झोपायला बाध्य केले जात आहे. तशी तक्रार काल रविवारी तेथे असलेल्यांनी भ्रमणध्वनीद्वारे माध्यमांकडे केली आहे. शारीरिक अंतर राखण्याच्या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे एकीकडे जिल्हा प्रशासन सांगत आहे. किंबहुना नियमांचे उल्लंघन करणार्यांोवर दंडात्मक कार्यवाही केली जात आहे. पण बाधितांना ठेवण्याच्या जागेवर याच नियमांना तिलांजली दिल्या जात आहे. जिल्हा व मनपा प्रशासाचे कोरोना केंद्रांकडे दुर्लक्ष होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मूल मार्गावरील वनराजीक महाविद्यालयतील केंद्रात एका खोलीत तीन, तर मोठी खोली असल्यास सहा बाधित रूग्ण ठेवल्या जात आहे. विशेष म्हणजे, एका खाटेवर दोघांना झोपायला सांगितले जात असल्याने कोरोना उद्रेक वाढेल की कमी होईल, असा संतप्त सवाल तेथे असलेल्या बाधितांनी केला आहे.

दरम्यान, याबाबत मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे यांना विचारणा केली असता, ही नवी बाब नसल्याचे ते म्हणाले. पहिल्या लाटेतही आपण एका खोलीत दोन, तीन आणि सहा खाटांवरही रूग्ण ठेवले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर एकाहून अधिक रूग्ण एकाच खोलीत असल्याचे ते म्हणाले. पण, रूग्णांच्या खाटांमध्ये अंतर असते. या केंद्रातील खाटांमध्ये अंतर दिसून येत नाही, असे विचारताच त्यावर ते बोलले नाही. तर मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी, याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्याशी सोमवारी चर्चा करून, रूग्णांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. वनराजिक महाविद्यालयाच्या कोरोना केंद्रात काही खोल्यांमध्ये बाधित खाली झोपतानाही आढळून येत आहे. येथे दाखल होणार्याा रूग्णांची गंभीरतेने दखल घेतली जात नसल्याचा आरोप बाधितांकडून केला जात आहे.

…ही तर गंभीर बाब : जिल्हाधिकारी गुल्हाने

कोरोना केंद्रातील खोली मोठ्या आकाराची असेल, तर दोन-चार रूग्णांच्या खाटा काही अंतरावर ठेवून बाधितांना ठेवल्या जाऊ शकतात. पण, एकाच खाटेवर दोन रूग्णांना झोपायला सांगणे, ही गंभीर बाब आहे. याबाबत आपण त्वरित पाहणी करू आणि त्यात सुधारणा केली जाईल, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.