न्याय देण्याऐवजी ठाणेदाराचे आरोपीस संरक्षण विधवा महिलेचा आरोप

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : हक्काच्या जमिनीसाठी न्यायाची भिक मागणा-या एका विधवा महिलेस मूलचे ठाणेदार न्याय देण्याऐवजी आरोपीस संरक्षण देत असल्याचा आरोप अन्यायग्रस्त साधना वाडगूरे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. आमच्या उदरनिर्वाहाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणा-या आरोपीकडून जीवे मारण्याची धमकी दिल्या जात असताना सुदधा ठाणेदार मुक भूमिका बजावत आहेत.

आरोपीवर फक्त गुन्हा दाखल करतात.परंतु त्यास अटक करण्याचे धाडस दाखवित नाही.ही सर्व आपबिती जिल्हा पोलिस अधिक्षकांना गुरूवारी सांगितली असून न्यायाची मागणी केली असल्याचे कोसंबी येथिल साधना वाडगूरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.याबाबत राष्टीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात येणार असून न्याय न मिळाल्यास तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा वाडगुरे यांनी दिला.
मूल तालुक्यातील कोसंबी येथे साधना वाडगूरे यांची सर्व्हे नंबर 95,96 अंतर्गत सिलींग कायदयातंर्गत मिळालेली वडिलोपार्जीत जमीन आहे.त्यावर त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो.या जमिनीशी कोसंबी येथीलच प्रकाश कवडूजी चौधरी यांचा कोणतीही संबध नाही.तरीही साधना वाडगूरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या असहायतेचा गैरफायदा घेवून प्रकाश चौधरी बेकायदेशिर जमिन बळकावण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

याबाबत मूल येथील दिवाणी न्यायालय आणि विदयमान जिल्हा दिवानी सत्र न्यायालयाने सुदधा आपल्या बाजूने निर्णय दिल्याचे साधना वाडगूरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.असे असतानाही पाच मे रोजी प्रकाश चौधरी आणि त्याच्या साथीदारांनी माझया भाउ बहिण आणि वहीणीस शेतात काम करीत असताना बेदम मारहाण केल्याचे सांगितले.भावाच्या पायाला जबर मारहाण झाली असल्याने वहिणीने मूल पोलिस ठाण्यात प्रकाश चौधरी याच्या विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे आणि वैदयकीय तपासणीच्या अहवालानुसार आरोपीविरूदध भादंवी कलम 324,504,34 अन्वये गुन्हा दाखल कला असला तरी ठाणेदारांनी आरोपीस अटक केली नाही. ठाणेदारांच्या अभयामुळे प्रकाश चौधरी आपल्या साथिदारासह आमच्या शेतात ठाण मांडून बसला आहे. शेतातील तीन फवारणी यंत्र,वीस सॉकेट पाईप आणि शेतमाल चोरून नेला आहे. शेतावर आल्यास आम्हालाच जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे वाडगूरे यांनी सांगितले. ठाणेदांराच्या संरक्षणामुळेच आरोपीची हिंमत वाढत आहे. आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.त्याला सर्वस्वी जबाबदार ठाणेदारच राहतील असा आरोप साधना वाडगूरे यांनी केला. . आरोपीवर कडक कारवाई करावी यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षकांना भेटून संपूर्ण आपबिती सांगितल्याचे त्या म्हणाल्या.

एका विधवा महिलेस आणि त्यांच्या कुटुंबियाना पोलिसांकडून न्याय मिळत नसेल तर आम्ही न्यायासाठी कुठे जावे असा प्रश्न त्यांनी केला.याबाबत राष्टीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करणार असून न्याय न मिळाल्यास तहसिल कार्यालयासमोर बेमूदत उपोषणास बसण्याचा इशारा साधना वाडगूरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.