आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही कोरोना उपचार मोफत करावे :

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

वणी : राज्यात कोरोनाची दुसरी लहर जीवघेणी ठरत असून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे जीव जात असून खाजगी रुग्णालयातील महागडे उपचार सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर झालेले आहे.

महाराष्ट्रा शेजारील आंध्रप्रदेश येथील मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी सर्व शासकीय सह खाजगी रुग्णालयात कोरोना उपचार मोफत केले असून कोरोना रुग्णांना जीवनदान देणारा कोरोना आजारातून मुक्त झालेल्या नागरिकांनी प्लाजमा डोनेट केल्यास पांच हजार रुपये देण्यात येत आहे व यासह कोरोना बधितांच्या अंतिम संस्कारासाठी पंधरा हजार दिल्या जात याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील कोरोनाचे सर्व उपचार मोफत करावे अशी मागणी वणी येथील माजी नगराध्यक्ष राकेश खुराणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.