धक्कादायक : कोरोनाने पती गेला,आईने पोरांसोबत केली आत्महत्या

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे फक्त आरोग्य व्यवस्थाच तणावाखाली आलेली नाही, तर नागरिकांच्या मनातही भीतीच वातावरण आहे. देशात दररोज 4 लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळतायेत आणि चार हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू होतोय. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मानसिक ताणतणावाखाली जात अनेकांना आत्महत्या केल्याचं प्रकार समोर आले आहेत. अशीच एक धक्कादायक आणि मनाला चटका लावून जाणारी घटना गुजरातमध्ये घडली आहे. गुजरातमधील द्वारका शहरात करोनामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं आहे. वृद्ध पतीचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर वृद्ध पत्नीनं आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी प्रसारमाध्यमांना याबाबतची माहिती दिली.

पोलिस आधिकारी पी.बी गढवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेशभाई जैन (60) हे नाश्त्याचं दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. शुक्रवारी जयेशभाई यांना कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर त्यांची पत्नी साधनाबेन जैन (57) आणि दोन मुलांनी टोकाचं पाऊल उचललं.

जयेशभाई यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर पत्नी आणि दोन्ही मुलं घरी परतली. त्यानंतर वृद्ध साधनाबेन जैन यांनी भावनेच्या भरात मुलं कमलेश (३५) व दुर्गेश (२७) यांच्यासह किटकनाशक प्राशन करत आपलं जीवन संपवलं. या तिघांचे मृतदेह घरातच मिळाले. या प्रकरणाची पुढील तपास केला जात आहे, असंही गढवी म्हणाले.