त्या कुटूंबाबर बहिष्कार टाकणा-या दोषींना शिक्षा द्या : आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : शहरातील भंगाराम वार्ड येथील जातपंचायतीच्या जाचामुळे 7 बहिणींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, प्रकाश ओगले असं 58 वर्षीय मृतकाचं नाव असून सोमवारी त्यांचा मृत्यू झाला.

मात्र मृत्यूनंतर गोंधळी समाजाच्या जात पंचायतीने त्यांच्यावर बहिष्कार टाकला. तसेच जो त्यांचा मदतीला आणि त्यांच्या पार्थिवाला खांदा देईल त्यावर जात बहिष्कृत करण्यात येईल अशी धमकी दिल्यामुळे प्रकाश ओगले यांच्या 7 मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला.

स्थानिक माध्यमांशी दिलेल्या माहीतीनुसार,गोंधळी समाजाच्या प्रकाश ओगले यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना समाजातील समारंभ, लग्न, कार्यक्रम यांना जाण शक्य होत नव्हत. त्यामुळे समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला. एवढेच नव्हे तर त्यांच्यावर आर्थिक दंडही लावण्यात आला. मात्र प्रकाश ओगले यांनी दंड भरला नाही. त्यामुळे हा बहिष्कार त्यांच्या मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतर ही कायम राहिला.
याबाबत भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार पत्रकारांशी बोलतांना म्हटलं आहे की,’आजच्या काळात एखाद्या कुटुंबावर बहिष्कार टाकल्या जात असेल तर ती चिंतेची बाब आहे, योग्य ती चौकशी करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे.’ असं मुनगंटीवार म्हणाले.