आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी पहिली तुकडी सेवाग्रामला रवाना

घुग्घुस : येथे आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रयास सभागृहात नेत्रचिकित्सा, चष्मे वाटप व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले होते. या शिबिरात 812 नागरिकांच्या डोळ्याची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 134 रुग्ण पात्र ठरले होते. या सर्वांची निःशुल्क शस्त्रक्रिया करून देण्यात येणार आहे.

नेत्रचिकित्सा शिबिरातील पात्र 40 रुग्णांची पहिली तुकडी निःशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सेवाग्रामला रवाना करण्यात आली. त्यांना एका ट्रॅव्हल्सने कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे पाठविण्यात आले. याप्रसंगी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले घुग्घुस येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र हे गोरगरिबांचा खरा आवाज आहे. सेवा केंद्र रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर आहे. सेवा केंद्रामार्फत अनेक रुग्णांना निःशुल्क वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात येते. रक्ताची किंवा रुग्णवाहिकेची आवश्यकता भासल्यास तात्काळ मदत मिळते. आपण सर्वांनी या सेवा केंद्राचा लाभ घ्यावा.

उपस्थित शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या रुग्णांनी व त्यांच्या नातेवाइकांनी निःशुल्क सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व भाजयुमोचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचे आभार मानले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, नकोडा ग्रामपंचायत सरपंच किरण बांदूरकर, डॉ. भारती दुधाणी, डॉ. पूनम गरडवार, डॉ. रंजना नकतोडे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, अमोल थेरे, भाजपा नेते अजय आमटे, बबलू सातपुते, अनंता बहादे, भारत साळवे, गुड्डू तिवारी, विनोद जंजर्ला, असगर खान, अनिल मंत्रिवार, गणेश खुटेमाटे, गौरव ठाकरे, घुग्घस प्रयास अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, पायल मांदाळे उपस्थित होते.