‘ ती ‘ शासकीय इमारत जनसेवेला समर्पित ; कोरोना लसीकरण केंद्र शुरू

घुग्घुस : येथील तुकडोजी नगर वॉर्ड क्रं.सहा मधील ओपन स्पेसवर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे 2014 साली अंदाजे 14 लक्ष रुपये खर्च करून ग्रामपंचायत सभागृह निर्माण करण्यात आले होते.

भाजप शहर अध्यक्षांचे भाऊ हे जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात कराटे शिकवणी वर्ग घेत होते त्याठिकाणी शाळेचे बांधकाम शुरू झाल्याने त्यांनी एक महिन्याच्या कालावधी साठी तात्पुरता शासकीय सभागृह मांगीतला होता. मात्र गेली सात वर्षे त्यांनी राजकीय शक्तिचा वापर करून अवैधरित्या या इमारतीवर कब्जा केला.
विद्यार्थ्यांन कडून मासिक शुल्क घेवून शासकीय इमारतीत व्यवसायीक कराटे शिकवणी वर्ग शुरू केले.
या शासकीय इमारतीचा लाभ गावातील तसेच वॉर्डातील सर्व सामान्य नागरिकांना झाला पाहिजे या करिता सदर इमारत नगरपरिषदेच्या ताब्यात घ्या अशी काँग्रेस नेत्यांना मागणी केली होती त्याची दखल घेत तहसीलदार यांनी सदर इमारत जप्त केली.
काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या मागणीनुसार सदर शासकीय इमारतीत आज दिनांक पाच ऑगस्ट पासून कोरोना लसीकरण केंद्राला सुरुवात करण्यात आली.
या केंद्रावर लसीकरणासाठी टेबले नागरिकांच्या बसण्यासाठी खुरसी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था राजूरेड्डी यांच्या तर्फे करण्यात आली. पहिल्या दिवशी दोनशे कोव्हकसीनचे प्रथम व द्वितीय डोज उपलब्ध करण्यात आले.

लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी अठरा ते चौरेचाळीस वर्षाच्या महिला व पुरुष नागरीकांनी प्रचंड उत्साहात लसीकरण मोहिमेत भाग घेतला याप्रसंगी शहर अध्यक्ष राजूरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, कामगार नेते सैय्यद अनवर, देव भंडारी, नुरुल सिद्दिकी, राजकुमार मुळे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.