काँग्रेसच्या दिग्गजांनी राखला गड; सलग वीस वर्षापासून सत्ता काबीज

0
758

चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील धाबा -तोहगाव या जिल्हा परिषद क्षेत्रात काँग्रेस पक्षाची जमेची बाजू ठेवत अस्तित्व टिकवणारे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अशोक रेचनकर व काँग्रेसचे ज्येष्ठ तालुका नेते देविदास सातपुते यांनी सलग वीस वर्षापासून अनुक्रमे सकमुर व पोडसा या ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व कायम ठेवून विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवण्याचे कार्य केले यामुळे काँग्रेसच्या या दिग्गजांनी गड राखल्याचे यंदाही बोलले जात आहे.

नुकत्याच पार पडलेल्या तालुक्‍यातील एकूण 43 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावून निवडणूक लढविली. तालुक्यातील काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धाबा तोह गाव या जिल्हा परिषद क्षेत्रात भाजपचा जि प सदस्य असतानाही सक मूर व पोडसा या ग्रामपंचायतीवर सलग वीस वर्षापासून काँग्रेसची सत्ता आहे. यंदाही पार पडलेल्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुकीत महिला आरक्षणानुसार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक रेचनकार हे स्वतः सदस्य म्हणून निवडून आले असून त्यांची पत्नी सौ अपर्णा अशोक रेच न क र यांना सरपंच पदी विराजमान होता आले आहे.

तर तिथून नजीकच असलेल्या पोडसा ग्रामपंचायतीवर सलग वीस वर्षापासून निवडून येत देविदास सातपुते यांनी सर्वसाधारण आरक्षणानुसार सरपंचपदाच्या विजयाची माळ गळ्यात घातली. काँग्रेस पक्षाच्या या दोन्ही दिग्गज तालुकास्तरीय नेत्यांनी परिसरात अनेक सामाजिक कार्य, केलेली असून मागील वर्षी कोरोना संकटात सापडलेल्या व तेलंगाना राज्यात गेलेल्या मजुरां प्रति संवेदनशीलता दाखवून हजारो मजुरांची भोजनाची व वास्तव्याची सोय करून त्यांना स्व गावी सोडण्याकरिता अथक परिश्रम घेतल्याची माहिती आहे. त्यांच्या या कार्याबद्दल देविदास सातपुते यांचा माननीय पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांचे हस्ते सत्कारही करण्यात आला होता. राजकारणात समाजकारणाची छाप सोडणारे वरील दोन्ही नेते यांच्या ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे