• तीन वर्षीय चिमुकलीला मातृत्वाची आस
✍️ मनोज कुमार कनकम
चंद्रपूर : आई – वडिलांच्या जीवनामध्ये खरे प्रेम कुठे शोधले जाईल तर ते त्यांच्या अपत्यांमध्ये. गरीब असो, श्रीमंत असो की गर्भ श्रीमंत असो, प्रत्येकजण आपल्या अपत्यावर मातृ पितृच्या प्रेमाचा वर्षाव करतात. परंतु अपत्य असूनही जर त्यात आई वडिलांना सूख शोधता येत नसेल किंबहुना त्यांना सुखापासून मुखावे लागत असेल तर… होय हे खरे आहे.
औद्योगिक शहर म्हणून प्रचलित असलेल्या घुग्घूस शहरात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. पंचेवीस गावांचा कार्यभार या रुग्णालयावर आहे. मागील वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या आजारात डॉक्टर वाकदकर दांपत्य याच रूग्णालयात कोरोना रुग्णांची सेवा करीत आहे. शहरात ते किरायाने राहतात. या आजाराने सर्वत्र हाहाःकार माजविला आहे. त्यामुळे आपल्या चिमुकलीचा सुरक्षित ठेवण्यासाठी मातृ पितृच्या छायेपासून दूर ठेवित आहेत. कधी स्व:ताचे घरमालकाचे घरी तिला ठेवतात. तर कधी शेजा-याकडे ठेवतात.
आज मातृत्व दिनाच्या निमित्ताने तीन वर्षीय ईश्वरीला ममतेच्या कुशीत घेण्याची आठवण आई अर्चना वाकदकर आणि वडील परमेश्वर वाकदकर यांना वारंवार हुंदके देणारी ठरत आहे.
घुग्घूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून परमेश्वर वाकदकर आणि त्यांच्या आयुष्यात सुखा दुःखात सदैव साथ देणारी त्यांची अर्धांगिनी अर्चना वाकदकर हे दोघेही वैद्यकीय अधिकारी म्हणून मागील 2020 मार्च महिन्यापासून आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. मागील वर्षी कोरोना महामारीची साथ आली दोघेही पती पत्नी
खांद्याला खांदा लावून कोरोनाच्या महामारीत कोरोना रुग्णांची सेवा करीत आहेत.
या दाम्पत्याला तीन वर्षांची “ईश्वरी ” नावाची मुलगी आहे. चिमुकलीची ही वय आई – वडीलांना आपल्रा कुशीत घेण्याची आहे. तिच्यावर संस्कार करण्याची आहे. तिला बोलायला, चालायला आणि मातृ पितृच्या प्रेमाचा वर्षाव करण्याची आहे. पण कोरोनाच्या महामारीत रुग्णांची सेवा सुरू असल्याने रुग्णांची सेवा हीच ईश्वराची सेवा समजून अविरत करताहेत. मात्र ते आपल्या लाडाच्या ईश्वरीच्या प्रेमाला मातृत्वाचे प्रेम मुकते आहे. सोबतच पितृ प्रेमाची छाया धूसर झाली आहे. रुग्णांची सेवा करीत असल्याने ईश्वरीला कवेत घेण्यास घाबरतात. त्यामुळे आता काही वेळ घरमालक तर काहीवेळ शेजारीच ईश्वरीला मातृ पितृत्वाची छाया देत आहेत. कधी कधी तर नाईलाजाने रुग्णालयात ठेवतात.
मागील वर्षी पहिल्या लाटेत तर चिमुकलीसह अख्खे कुटूंब कोरोनाग्रस्त झाले होते. त्यावर मात करीत विजय मिळवून पुन्हा कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची सेवा करीत आहेत. आज कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वैद्यकीय क्षेत्रावर प्रचंड दबाव आलेला आहे. वैद्यकीय क्षेत्रही या महामारीने क्षतिग्रस्त होत आहे. अश्या स्तिथीत एक आई म्हणून आपल्या चिमुकलीची प्रचंड काळजी वाटते आहे.
कोरोना महामारीचा हा काळ लवकर निघून जावो आणि परत नेहमी प्रमाणे आपल्या ईश्वरी चिमुकलीला आपल्या कवेत घेवून आज मातृत्वाचा सुख घेता येवो या करीता देवाकडे प्रार्थना करतात. आज जागतिक मातृत्वदिनी माध्यमांकडे बोलतांना डॉक्टर वाकदर दाम्पत्याने आपल्या मातृ पितृ प्रेमाच्या आठवणी ताज्या केल्या. त्यांच्या मातृत्व पितृत्वाला लवकरच प्रेम लाभो हिच सदिच्छा!