अपक्ष आमदाराचे दे धक्का आंदोलन तर भाजपचे घंटानाद आंदोलन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस वाहनाच्या काचा फोडल्या

चंद्रपूर : येथे मनपा समोर गांधी चौकात आमदार किशोर जोरगेवार ह्यांनी मनपा महापौर ह्यांच्या वाहन खरेदीला आव्हान देत दे धक्का आंदोलन घोषित केले होते तर त्याच्या विरोधात भाजपा महानगर तर्फे किशोर जोरगेवार ह्यांच्या विरोधात रेती माफियांवर कारवाई करण्यासाठी आजच आंदोलन छेडण्यात आले होते.
दोन्ही पक्षांनी गांधी चौकात आपापले मंडप घालुन आंदोलनाची तयारी सुरू केली होती.

दोन्ही बाजूंचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले मात्र दोन्ही आंदोलनांना पोलीस प्रशासनाने परवानगी दिली नव्हती.
कोरोना निर्बंध व वाढत असलेला जमाव ह्यामुळे पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला होता. अखेर पोलिसांनी दोन्ही पक्षांचे बॅनर, होल्डिंग तसेच मंडप हटवून आंदोलन बंद पाडले.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या विरोधात भाजपने गांधी चौकात घंटानाद आंदोलन केले. यावेळी भाजप नेत्यांनी रस्त्यात ठिय्या दिल्याने पोलिसांनी भाजप जिल्हाध्यक्ष, महापौरांसह काही प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी युवामोर्चा कार्यकर्त्यांना वाहनाने पोलिस मुख्यालयाकडे नेत असताना भाजप युवामोर्चा कार्यकर्त्यांनी वाहनाच्या काचा फोडून संताप व्यक्त केला. यामुळे शहरात चांगलेच वातावरण तापले आहे.

विशेष म्हणजे, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात चार एक्के, दे धक्के या आंदोलनाचे आयोजन केल्यानंतर भाजपने घंटानाद आंदोलन केले.