अवैध बांबु ताटवे वाहतुक करण्याऱ्या मेटॉडोर जप्त 

0
225
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

बल्लारशाह : दिनांक 10/02/2021 रोजी मेटॉडोर क्र. MH – 34 M – 2404 मध्ये इटोली गिलबिली या मार्गावर अवैधरित्या सरकारी वनातुन बांबु कापुन त्यापासुन ताटवे तयार करुन वाहतुक करीत असतांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी महेंद्र नामदेव राखुंडे रा. अजयपुर यांना प्रविण विरुटकर, क्षेत्र सहाय्यक मानोरा, वनरक्षक प्रविण बिपटे, सहाय्यक उमरी यांनी सापळा रचुन नमुद मेटॉडोरसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर वाहनात 140 नग ताटवे विनापरवाना वाहतुक करीत असल्याचे निदर्शनास आले.

त्यावरुन वाहन व वनोपज जप्त करुन आरोपी महेंद्र नामदेव राखुंडे रा.अजयपुर यांचे विरुदध भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 ( 1 ) ब अन्वये, महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे नियम क्रमांक 41 अन्वये नुसार वनगुन्हा क्रमांक -76/11 दिनांक 10/02/2021 नोंद करण्यात आला. सदर वनगुन्हयाचा तपास संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी, यांचे मार्गदर्शनात श्री. प्रविण विरुटकर, क्षेत्र सहाय्यक, मानोरा करीत आहे.