कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करीत चिमूर नगर परिषदला ठोकले कुलूप

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• कार्यालयातील कर्मचायांना धक्का बुक्की
• सहा आरोपीना अटक
• २४ मे पर्यत न्यायालयीन कोठडी

चंद्रपूर : चिमूर येथील नगरपरिषदेमध्ये शहरातील रूग्णालया असणाऱ्या कोरोना रूग्णांच्या माहितीचा लेखा जोगा नसल्याने आणि हिलींगटच मल्टी स्पेशालीटी हॉस्पीटलवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने नगरपरिषदेला कुलूप ठोकल्याचा घटना काल सोमवारी (10 मे) ला सायंकाळच्या सुमारास घडली. तसेच नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की बुक्की करून प्रशासकीय कामात अडथळा आण्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. सहाही जणांना 24 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींमध्ये सारंग दाभेकर (५२वर्ष) रा चिमूर, विलास मोहीनकर (३०वर्ष) रा चिमूर, कैलास भोयर (४२वर्ष) रा सोनेगाव ( काग ), शैलेश भोयर (२२वर्ष) रा सोनेगाव ( काग ), सिद्धांत कोब्रा (२७वर्ष) रा नागभिड, आदर्श कोब्रा (२५) रा नागभिड यांचा समावेश आहे.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास नगर परिषदचे अधिकारी व कर्मचारी शासकीय कामकाज करीत असताना गैर कायद्याच्या मंडळींनी नगर परिषदच्या लोखंडी गेट जवळ येवून जोरदार नारेबाजी केली. दरवाजाजवळ दोन कर्मचाऱ्यांनी येवून पाहिले असता, शहरातील हिलींग टच हॉस्पीटलवर का कारवाई का केली नाही असे विचारून प्रशासकीय कामात अडथळा आणला. नगर परिषदेचया अधिकाऱ्यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी आल्यानंतरही सदर व्यकती पुन्हा जोरजोराने ओरडून नारेबाजी करीत होते. पोलिसांनी समजून काढण्याचा प्रयत्न केल्यानंतरही सदर व्यक्ती ऐकृण्याच्या मनस्थिती नव्हते. प्रवेशव्दारा कुलूप लावन्याचा प्रयत्न करीत असताना अधिकाऱ्यांनी कुलूप लावन्यास मनाई केली असता कार्यालयातील गेट वर असलेले सुमित मेश्राम व राजेश सहारे यांना धक्का बुक्की केली.

कार्यालय तोडफोड करण्याची धमकी दिली व तासभर शासकीय कामात अडथळा निर्माण करीत आत मध्ये डांबून धरले आणि नगर परिषदला कुलूप ठोकले. अखेर पोलिसांनी त्यांचेवरन कारवाई करीत त्यांना अटक केली. त्यामध्ये एक पोर्टलचा उप संपादक, तिन सामाजीक कार्यकर्ता व दोन भारतीय क्रांतीकारी संघटनाचे पदाधीकाऱ्यांचा समावेश आहे. पोलीसांनी सहा आरोपीवर भादंवी ३५३, ३३२, ३४२, १४३, १४७, १४९ व आपत्ती व्यवस्थापन कायदा ५१ साथ रोग कलम ३ महाराष्ट्र पुलीस अधिनीयम १३५ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली. आज मंगळवारी सहा आरोपीना चिमूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ मे पर्यत १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.