डॉ. प्राचार्य अशोकभाऊ जिवतोडे यांच्या वाढदिवसा निमित्त फळ, मास्क व मिठाई वाटप कार्यक्रम संपन्न

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवार 11 जून रोजी ओबीसी व विदर्भ चळवळीचे दमदार नेते तथा सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रणी डॉ. प्राचार्य अशोकभाऊ जिवतोडे, सचिव चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रात भर्ती असलेल्या रुग्णांना घुग्घुस येथील सर्वपक्षीय नेते व सामाजिक कार्यकर्त्या तर्फे फळ, मास्क व मिठाईचे वाटप करण्यात आले.

यावेळी घुग्घुस कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विठोबा पोले म्हणाले आज 21 प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ करण्यात येणार आहे. डॉ.प्राचार्य अशोक भाऊ जिवतोडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने आम्ही सर्वपक्षिया सोबत एकत्र येऊन रुग्णांची विचारपूस करीत फळ, मास्क व मिठाई चे वाटप केले आहे. अशोक भाऊंना दीर्घ आयुष्य लाभो अशी शुभकामना देतो.

काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. संगीता बोबडे म्हणाल्या की अशोकभाऊ जिवतोडे यांचे कार्य खरोखरच मोठे आहे. शिक्षण क्षेत्र असू द्या की सामाजिक क्षेत्र, भाऊंनी त्यात आपला ठसा उमटविला आहे. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी ते लढा देत आहे.

यावेळी भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे, काँग्रेस नेते नारायण ठेंगणे, घुग्घुस शिवसेना नेते बंटी घोरपडे, घुग्घुस यंग चांदा ब्रिगेडचे नेते इम्रान खान, युवासेना नेते हेमराज बावणे, भाजपा नेते विनोद चौधरी, डॉ. परमेश्वर वाकदकर, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रेमलाल पारधी, मधुकर मालेकर, सुरेश बोबडे, जनाबाई निमकर, चंद्रशेखर बोबडे सर अरविंद असुटकर सर, रत्नाकर शिखरे, सदानंद बोधणे सर, विभाकर नांदे सर, लिपिक सुरेंद्र भोंगळे, कवडू गिलबिले जनता विद्यालयाचे शिक्षकवृंद, कर्मचारी उपस्थित होते.