चंद्रपूर : ग्रामविकास निधी अंतर्गत घूग्घूस, वेंडली, उसगाव येथे सिमेंट काँक्रीट व पांदन रस्ते मंजूर करण्यात आले आहे. ६० लक्ष रुपये खर्च करुन होत असलेल्या या विकास कामांमुळे येथील जूनी मागणी सुटली असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे. या कामांचे आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमीपूजन करण्यात आले.
यावेळी राजू रेड्डी, माजी नगरसेवक बलराम डोडानी, वेंडलीच्या सरपंच प्रतिभा अलवलवार, उपसरपंच राजकुमार नागपूरे, माजी सरपंच कैलाश चिवंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य जंगलू पाचभाई, सामाजिक कार्यकर्ता बळवंत धानोरकर, सतिश पाचभाई, उसगावच्या सरपंच निविता ठाकरे, उपसरपंच मंगेश आसुटकर, ग्राम पंचायम सदस्य मंगल फुलझेले, बाळा चरडे, यमुना राजूरकर, रेखा कोडापे, रेखा उईके, वर्षा बोंडरे, सरिता काळे, हनुमंता नैताम, शांताराम भोयर, विठ्ठल ठाकरे, नथ्थू जोगी, स्वप्नील ठाकरे, संदेश ठाकरे, गणेश बोडे, रवि उईके, रमेश ठाकरे, अमोल रायपूरे, खुशाल ठाकरे, मुन्ना लोडे, इम्रान खान, स्वप्नील वाढई, अनुप भंडारी, कल्याण सोदारी, मोहम्मद रफीक, प्रितम भोंगळे, सयद अनवर, बालकिशन कुळसंगे, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, शिक्षण विभागाचे प्रमूख प्रतिक शिवणकर, युवा नेते अमोल शेंडे, विलास सोमलवार, पंकज गुप्ता, विश्वजीत शाहा, हरमन जोसेफ, विनोद अनंतवार, मुन्ना जोगी, राम जंगम, प्रकाश पडाल,नितिन शाहा, राशिद हुसेन, बबलू मेश्राम, गौरव जोरगेवार आदिंची उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या कडून शहरी भागासह ग्रामीण भागाच्या विकास कामांकडेही विशेष लक्ष दिल्या जात आहे. या भागातील अनेक कामे प्रस्तावित आहे. या भागातील रस्ते व पांधण रस्ते तयार करण्यात यावेत या करीता आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु होते. याची फलश्रृती स्वरूप घूग्घूस, उसगाव, आणि वेंडली येथील रस्त्यांच्या कामाकरीता ग्रामविकास निधीतून निधी उपलब्ध करुन देण्यात त्यांना यश आले असून घूग्घूस येथील सिमेंट काँक्रीटच्या रोडसाठी २५ लक्ष, उसगाव येथील रोडकरीता १० लक्ष आणि वेंडली येथील पांदण रस्त्याकरिता २५ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. आज या कामांचे भुमीपूजनही आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची जूनी मागणी पूर्ण करता आली याचे समाधान असून यापूढेही वेगवेगळ्या निधी अंतर्गत ग्रामीण भागातील समस्या सोडविल्या जातील असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
विधीवतरित्या या कामांचे भुमीपूजन पार पडल्यानंतर आता लवकरच या कामांना सुरुवात होऊन ते पूर्ण होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यासह गावक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.