चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे राहणाऱ्या मालकाने आपल्याच नोकराच्या पत्नीवर अत्याचार केल्याची घटना घडली या प्रकरणी पीडित महिलच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
कदीर पठाण वय 35 वर्षे राहणार चंदनखेडा असे आरोपीचे नाव आहे कदीर याच्या कडे फिर्यादीचा पती गाडीवर काम करायचा घटनेच्या दिवशी कदीर हा नोकराच्या घरी गेला होता. तो घरी नसताना बघून त्याने त्याच्या पत्नीवर अत्याचार केला या घटनेची माहिती पीडित युवतीने आपल्या पतीला सांगितली भद्रावती पोलिसात घटनेची तक्रार दिली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास ठाणेदार सुनील सिंह पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
















