घरगुती वादातून सास-यांनी केली सुनेची हत्या

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : सुनेसोबत झालेल्या घरगुती भांडणातून रागाच्या भरात फरशीच्या तुकड्याने सास-याने सुनेच्या डोक्यावर व मानेवर वार करून हत्या केल्याची घटना काल सोमवारी (12 एप्रिल) ला दुपारच्या सुमारास टेंभुर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत चेक नवेगाव येथे घडली. गिता दिपक कन्नाके (२८) असे मृत सुनेचे ना आहे. आरोपी सासरा भुजंग झिठु कन्नाके याला पोंभूर्णा पोलीसांनी अटक केली आहे.

पोंभूर्णा पोलीस ठाणेच्या हद्दीतील चेक नवेगाव येथील आरोपी भुजंग कन्नाके याचे सोमवारी दुपारच्या सुमारास घरगुती कारणातून सून गिता दिपक कन्नाके (२८) हीचेशी भांडण झाले. दोघांमधील भांडण विकोपाला गेल्याने फरशीच्या तुकड्याने सास-याने सुनेच्या मानेवर व डोक्यावर वार केले. यात सुन गंभीर जखमी झाल्याने ती जागीच गतप्राण झाली. मृत सुनेच्या पश्चात पती, ३ मुले असा परिवार आहे. तिच्या मृत्यूने कुटुंब आई पाहून पोरके झाले आहे.

सदर घटनेची तक्रार मृत सुनेचे वडील वामन रावजी पेंदोर मु. कोरपणा यांचे पोंभूर्णा पोलिसांना केली. पोलिसांनी घटनास्थळी येवून आरोपी सासरा याला अटक केली आहे.