भगतसिंग वॉर्डात देशी दारू दुकानाला नागरिकांचा विरोध

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

पोलिस ठाण्यावर दिली धडक ; स्थानांतरण थांबविण्याची केली मागणी

चंद्रपूर : ब्रह्मपुरी येथील भगतसिंग वॉर्डात देशी दारू दुकान स्थानांतरित करण्यात आले आहे. मात्र, वर्दळीच्या ठिकाणी दारू दुकान नको म्हणून येथील संतप्त नागरिकांनी पोलिस ठाण्यावर धडक दिली.

यावेळी दारू दुकानाचे स्थानांतरण थांबविण्याची मागणी करण्यात आली. क्रांतिवीर भगतसिंग यांचा पुतळा, विवेकानंद रुग्णालय व वंशिका टेक्निकल इन्स्टिट्यूट या नावाचे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत महिला प्रशिक्षण केंद्र असलेल्या रहिवासी व वर्दळीच्या ठिकाणालगत आशा किशोर रत्नपारखी व इतर काही नागरिकांच्या मालकीचे देशी दारू दुकान स्थानांतरण करण्यातआले आहे.

येथील नागरिकांनी या दुकानाच्या स्थानांतरणाला विरोध केला आहे. शेकडो महिला – पुरुषांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत पोलिस निरीक्षक रोशन यादव यांच्याकडे दुकानाचे स्थानांतरण थांबविण्यात यावे, अशी मागणी केली आहे. शहरातील शहीद भगतसिंग चौक येथे पुल्लूरवार यांना ग. क्र. ५४२ मध्ये निवासाचे प्रयोजनाकरिता तत्कालिन नायब तहसीलदार यांच्यामार्फत जागेचा पट्टा देण्यात आला होता. या अतिक्रमित जागेवर आशा किशोर रत्नपारखी व इतर काही नागरिकांनी जिल्हा उत्पादन शुल्क विभागाकडून अनुज्ञप्ती मंजूर करून घेत मद्यसाठासुद्धा उपलब्ध केलेला आहे.

त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. स्थानांतरित देशी दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी पोलिस ठाणे गाठून नागरिकांनी ठाणेदार रोशन यादव यांना निवेदन दिले. तसेच या मागणीचे निवेदन जिल्हा उत्पादन शुल्क, जिल्हाधिकारी त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चंद्रपूर यांनासुद्धा दिले आहे. निवेदन संताप व्यक्त होत आहे. देताना नगरसेवक महेश भरें, माजी स्थानांतरित देशी दारू दुकान उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, सामाजिक बंद करण्याच्या मागणीसाठी पोलिस कार्यकर्ते अविनाश राऊत, ओमप्रकाश ठाणे गाठून नागरिकांनी ठाणेदार बगमारे, विष्णू तोंडरे, विनोद झोडगे, रोशन यादव यांना निवेदन दिले. सूरज शेंडे यांच्यासह वॉर्डातील तसेच या मागणीचे निवेदन जिल्हा महिला, पुरुष व विद्यार्थी उपस्थित उत्पादन शुल्क जिल्हाधिकारीहोते.