घुग्घुस : जिल्ह्यातील दारूबंदी पालकमंत्री विजय भाऊ वड्डेटीवार यांनी उठविल्या नंतर जिल्ह्यातील दारू दुकाने, बीअर बार, देशी दुकाने शुरू झालेली आहे.
आता याचाच फायदा उठविण्या साठी भंडारा येथील यशपाल अमरलाल जेठवाणी यांनी घुग्घुस परिसरात कुंगवाणी देशी दारू दुकाना करिता परवानगी मांगीतली असून घुग्घुस नगरपरिषदे तर्फे दिनांक 6 ऑगस्ट रोजी “ना’ हरकत परवानगी करिता जाहीरनामा प्रकाशित केला असून या देशी दुकानाला काँग्रेसने विरोध केला आहे.
आधीच गावात जवळपास तीन देशी दारू दुकाने, सतरा वाईन बार, बिअर शॉपी असे मोठया प्रमाणात दारू दुकाने असल्याने या देशी दारूच्या दुकानाला परवानगी देण्यात येऊ नये. अशी मागणी घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, महिला काँग्रेस शहर अध्यक्षा सौ. विजया बंडीवार, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी,कामगार नेते सैय्यद अनवर यांनी घुग्घुस नगरपरिषद प्रशासक यांना निवेदन देऊन देशी भट्टीला विरोध दर्शविला असून जर नगरपरिषदेने परवानगी दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस तर्फे देण्यात आला आहे.