डॉ. योगिता गावंडे(भसारकर) आचार्य पदवीने सन्मानित

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : सावली तालुक्यात पाथरी येथील रहिवासी असलेल्या शैक्षणीक व सामाजिक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावणा-या प्रा. योगिता गावंडे (योगिता सुजित भासारकर) यांना गोंडवाना विद्यापीठांची आचार्य पदवी (पी.एच.डी.) प्रदाण करण्यात आली आहे.

सदर पदवी ही गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या मानव्य विद्याशाखा अंतर्गत इतिहास या विषयातील “तंट्या भिल व्यक्ती आणि कार्य – एक ऐतिहासिक मूल्यमापन” अशा अतीशय दुर्मीळ शोध प्रबंध पदवी काळात पुर्ण करुन आचार्य पदवीस पात्र झाल्या असल्याचे बोलले जात आहे सदर शोध प्रबंध हा विषय अतिशय दुर्मिळ आणि विद्यापीठासाठी नवीन असल्याने समीक्षकांनी व मार्गदर्शकांनी यांनी मान्य केले यांच्या अशा विषयांच्या विद्यार्थ्यांना व पुढच्या पिढीला चांगला लाभ होणार असल्याची माहीती आचार्य डाॅ, गावंडे यांनी दिली, त्यांच्या या यशात त्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन त्यांचे वडील बंधू पवन गावंडे (एम.टेक) टोरंटो – कॅनडा यांचे लाभले, तर त्यांच्या मार्गदर्शक म्हणुन ब्रम्हपुरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ.मीता रामटेके यांचे मोलाचे मार्गदर्शण लाभले, व संशोधन केंद्र महात्मा गांधी कॉलेज आरमोरी येथील होते आपल्या यशाचे श्रेय त्यांच्या आई,व पती श्री,सुजीत भसारकर यांना देतात.

पीएचडी करीता मोलाचे सहकार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर (बार्टी) पुणे व डॉ. बाबा भांड सर (औरंगाबाद)डॉ. प्रकाश कुंभरे, डॉ. भास्कर मदनकर, डॉ. राजेंद्र घोनमोडे, डॉ. रुपेश मेश्राम ,डॉ.मिलिंद भगत, डॉ.दुबे सर, डॉ विजया साखरे (नांदेड) ,नम्रता गावंडे आदींचे सहकार्य लाभले.