नारंडा – वनोजा येथे जाणाऱ्या बसचे वनसडीत स्वागत जेष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना दिलासा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

युवा नेते रोशन आस्वले प्रयत्नाला यश

कोरपना (चंद्रपूर) : नारंडा व वनोजा येथे जाणाऱ्या बसेस नारंडा फाट्यावरून जात होत्या ह्या सर्व बसेस वनसडी बस स्थानकाला येत नव्हता याचा त्रास वृद्ध नागरिक व विद्यार्थ्यांना होत होता . राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री सुभाषभाऊ धोटे व जेष्ठ नेते राजाबाबू गलगट यांच्या मार्गदर्शनाखाली रोशन आस्वले यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून सदर सर्व बसेस वनसडी बस स्थानकापर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न केला व दिनांक 12-10-2021 पासून वनोजा व नारंडा येथे जाणारी बस ,बस स्थानकावर आली या बसचे स्वागत युवा नेते रोशन आस्वले ,विजय पिंपलशेंडे , ज्ञानेश्वर पिंपळकर , महेश फरकाड़े , प्रमोद बुरांडे यांनी केले.

वनसडी हे कोरपणा तालुक्यातील महत्वाचे गाव असून , आठवडी बाजार , बँक ऑफ इंडिया ची शाखा व विविध शासकीय कार्यालये आहेत त्यामुळे परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांना या बसेसचा उपयोग होईल व महामंडळाला आर्थिक लाभ सुध्दा होणार आहेत.